ASL इको सायक्लोथॉन
ASL इको सायक्लोथॉन बद्दल
banner

सायकल स्पर्धेमागचा उद्देश …

प्रत्येक शहर व उपनगरांमध्ये प्रदूषणाची समस्या अत्यंत गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. प्रत्येक घरटी प्रत्येक माणसी एक मोटारसायकल व एक कार दिसते, हेच या प्रदुषणाच्या समस्यचे मूळ आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जाहिरातींद्वारे गाड्यांच्या विक्रीचे विक्रमांच्यावर विक्रम रचतात. मात्र याद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा व प्रदुषणाद्वारे होणाऱ्या पर्यावरणावरील परिणामांचा विचार केला जात नाही.

अलीकडच्या काळात मोटारसायकल व कार यांची सर्वच स्तरावरील लोकांना सवय जडली आहे. त्यामुळे प्रदूषण तर वाढतेच व स्वयंचलित वाहनांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या गोष्टीची जाणीव प्रत्येकास आहे. पण कोणीच काही करीत नाही .

स्थानिक विभागात नोकरी धंदा करणारे लोकही नाहक पेट्रोलचा धूर काढताना दिसतात. मागे काही इंग्रजी चित्रपटांमध्ये स्कॉटलंड यार्डाचे पोलिस गुन्हेगारांना पकडतात हे चित्र पाहायला मिळले. खरोखरच कमीत कमी स्थानिक विभागात जर सर्वानीच सायकलीचा वापर केला तर किती मोठ्या प्रमाणात इंधन वाचेल व प्रदूषण कमी होईल. सायकलचा प्रवास आरोग्यदायी आहेच मग लोकांचे आरोग्य देखील सुधारेल.

लोक प्रबोधन व्हावे व जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी हि कल्पना घेउन अभिषेक शेल्टर्स तर्फे दरवर्षी ५ जून २०१३ या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते असते. ५ जून २०१३ रोजी पर्यावरण दिनानिमित्त सर्व लहानथोरांनी कुळगांव-बदलापूर शहरात सायकल चालवून 'सायकल चालवा, पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यासाठी 'ड्रीम रान' मध्ये सहभागी व्होवे. या निमित्ताने काही दूरचित्रवाणी कलाकार, पत्रकार, राजकीय नेते सायकलिंग करणार आहते. कुळगांव-बदलापूर शहरातील सुजाण नागरिकांनी या दिवशी वाहनांचा वापर टाळावा व प्रदूषण कमी करून पर्यावरण वाचवण्याचा प्रयन्त करावा हि विनंती ….


श्री. शैलेश वडनेरे
आयोजक

श्री. शैलेश वडनेरे
शिवसेना विभागप्रमुख - शिवसेना शाखा दत्तवाडी, बदलापूर
संचालक - अभिषेक शेल्टर्स लिमिटेड, बदलापूर
Top
Copyright @ 2013 ASL Eco Cylothon
Phone
+91 7350113444
Site designed by Web-Mantra
Sponsor